About us

Gavthiblogger

नमस्कार मित्रांनो, माझं नावं नितीन अनिता पंढरीनाथ राठोड (Nitin Anita pandharinath Rathod), माझ्याबद्दल सांगण्यासारखं तसं तर काही नाहीये, पण माझ्याबद्दल थोडक्यात सांगतो, मी जेव्हा 2013 ला 2nd year mechanical Engineering ला होतो तेव्हा मला फोटो काढण्याचा खूप नाद होता, तेव्हा मी facebook वर एक पेज तयार केल. त्यावर मी mobile मध्ये क्लिक केलेले फोटो टाकत होतो. ते पेज अजून पण आहे. त्यावर सध्या 50k followers आहेत. पण जस जस पुढच्या वर्षाला गेलो तेव्हा माझी फोटो काढण्याची आवड कमी झाली, मला अस वाटत 3 idiots पाहून माझ्यात फोटो काढण्याची आवड निर्माण झाली असेल. पण जेव्हा 2015 ला final year ला आलो तेव्हा फोटो काढण्याची आवड ही एकदमच कमी झाली. कारण कॉलेजला कॅम्पस इंटरव्यू होणार होते. पण त्यामध्ये माझं काही selection झालं नाही.

मित्रांनो final year चा result लागला. 70% घेऊन एवढा आनंद झाला जस काही फोन करून कंपनी आपल्याला interview ला बोलवेल. पण अस काही झालं नाही. नंतर कळालं आपल्याला तर जॉब without referance लागणार नाही, तेव्हा वडिलांच्या ओळखीने मला एका कंपनीत जॉब भेटला. 7 ते 8 महिणे जॉब केला पण कामात काही मन लागलं नव्हता. सहज एक दिवस मोबाईलवर Facebook पाहत होतो, तेव्हा मला कळालं की facebook instant article through आपण पैसै कमवू शकतो. Instant article हे एक google च्या blogger platform सारखं होत. म्हणजे ते platform आता facebook ने बंद केल आहे. मला 2016 ला पहिल्यांदा Facebook instant article च approval भेटल. पण तेव्हा पोस्ट कशी लिहायची हे माहीत नव्हत. तेव्हाच मला Google च्या blogger platform बद्दल कळाल. तेव्हा मी blogger बद्दल सगळी महिती घेतली. एक वर्ष लागलं मला शिकायला.

Facebook तेव्हा जास्तं पैसै देत नव्हत. तेव्हाच uc browser च पण news portal होत तेच्या through सुध्दा मी पैसै कमवले. पण सगळ्यात जास्त पैसा हा blogger platform वर होता. तेव्हा wordpress बद्दल जास्त माहित नव्हत. माझी सगळ्यात पाहिली website ही news website होती. नंतर मी hindi biography वर एक website बनवली. मला वेग वेगळ्या motivational व्यक्तीची माहिती वाचायला आवडायची. त्यामुळे मी biography वर website बनवली. पण काही कारणामुळे ती website बंद पडली (Spam reason मुळे ती website बंद पडली होती).

नंतर मला 2017 च्या ending मध्ये wordpress platform बद्दल कळाल, तेव्हा मी परत wordpress बद्दल सगळी माहिती घेतली. आणि एक मराठी website बनवली. ती पण multi Niche वर, पण तेव्हा मला कळाल की, मराठी website ला Google Adsense approval भेटत नाही. तेव्हा परत मी depression मध्ये गेलो. म्हणल, काय फायदा झाला एवढं सगळ करून. पण मी हार मानली नाही. 2018 ला Google ने मराठी website साठी adsense approval साठी परवागणी दिली. म्हणजे पहिले मराठी website ला monetization system नव्हती. Third party ads वापराव लागत होते. जस approval भेटल मग विचारू नका…. त्या रात्री मला झोप आली नाही. मित्राला सांगितल तर त्याने Google हे नाव ऐकलं. तेव्हा तर विचारूच नका त्याचा चेहरा हा बघण्यासारखा होता. त्यानंतर मी बरेचं experiment करून पहिले. तेव्हा cpc पण खूप कमी होता. तेव्हा मी godaddy च hosting आणि Domain घेतल होत आणि cloudflare च SSL certificate. तेव्हा SSL certificate पण विकत घ्यावा लागत होत. तेव्हा एवढं कळतं नव्हत की, एकटा माणूस multi niche वर काम करु शकत नाही. 2019 ला थोडी अक्कल आली आणि नंतर singal niche वर काम करण्यास सुरुवात केली.

माझे गुरू हे Billi4you चे founder Tausif khalid होते. हे तेव्हा एकमेव होते जे ब्लॉगिंगबद्दल youtube वर माहिती देत होते. ते पण फ्रीमध्ये. हि गोष्ट 2016 ची आहे. मित्रांनो मला या teaching च्या क्षेत्रात यायचं नव्हतं. कारण मला कोणती गोष्ट कशी explain करून सांगायची हे माहित नव्हतं. तस तर मी article लिहत होतो. पण अस voice recording करून सांगणं म्हणजे जरा अवघडच आहे. मी जेव्हा youtube पाहिलं तेव्हा काही जण 50 हजार पर्यंत blogging कोर्स विकत होते. Blogging मध्ये अस काही rocket science सारखं काही नाहिये, ज्याला 50k देऊन आपण विकत घेऊ शकतो. एकदम कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये सुरू होणारा हा एक बिझनेस आहे. पण या blogging च्या कोर्ससाठी काही जणांनी बरेच पैसे दिले होते. ते मला आवडलं नाही. म्हणून मी या instagram आणि youtube च्या क्षेत्राकडे हळूहळू वळालो. Blogging करून मी, थोड फार guide करण्याचा प्रयत्न करतो. जे पण मी 2016 पासून शिकलो आहे ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असतो, ज्यामुळे तुमचा टाईम वाचतो.

Research चा किडा पहिल्यापासून आंगात आहे?

मित्रांनो 2014-15 ला कॉलेजमध्ये आम्ही एक evenet organise केला होता. त्या event च नावं हे “1001 invention” असं होत. यामध्ये आम्ही आतापर्यंत जेवढे पण शोध लागले आहे, त्याची माहिती पोस्टरद्वारे कॉलेजमध्ये प्रेझेंट केली होती. खूप research करून आम्ही ती माहिती गोळा केली होती. रिसर्च काम हे मी आणि माझ्या मित्राकडे होतं, अहो रात्र काम करून आम्ही ही माहिती गोळा केली होती. म्हणून रिसर्च कसे करतात हे थोडं फार मला माहित आहे. म्हणून या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला मी तेच देण्याचा प्रयत्न करणार आहे.

माझी छोटीशी टीम आहे

टीमचे नावंकाय काम करता
नितीन (GavthiBlogger)Content writing, SEO, Research and Editing
धीरजResearch and Content writing
कोमलResearch and Content writing
रुपेशResearch and Content writing
अतुलResearch and Content writing
अक्षयResearch and Content writing

मित्रांनो मला या क्षेत्रात आठ वर्षे झाली असून, माझी एक छोटीशी टीम आहे, ज्यात 5 content writers आहेत. धीरज, कोमल, रुपेश, अतुल आणि अक्षय. यात धीरज जो आहे, त्याच्या 20 पेक्षा जास्त पोस्ट या wikipedia ने reference म्हणून यूज केल्या आहेत. आणि कोमल ही आता एका मोठ्या news चॅनल मध्ये काम करते. खूप आनंद होतो की, आपल्या टीम मधली एक मेंबर एका मोठया न्युज चॅनलसाठी काम करते. बाकी मेंबर्स शिकताय. सध्या आम्ही Total 10 website वर काम करतोय. सगळया website या single Niche आहेत.

आपण या वेबसाईटद्वारे काय शिकणार आहोत?

मित्रांनो यावर आपण संपूर्ण ब्लॉगिंग बद्दल एकदम बेसिक टू ॲडव्हान्स शिकणार आहोत. यामध्ये ब्लॉगिंग म्हणजे काय? डोमेन काय असतं, होस्टिंग कशी purchase करायची? कीवर्ड कसे रिसर्च करायचे? त्याचबरोबर फीचर इमेज कशी तयार करायची आणि अजून बऱ्याच गोष्टी आपण या ब्लॉगच्या माध्यमातून शिकणार आहोत.