Google Search Console Insights म्हणजे काय? फायदे आणि वापराची संपूर्ण माहिती

मित्रांनो आपण जेव्हा एखादी वेबसाईट चालवतो, ब्लॉग लिहितो, किंवा काही माहिती टाकतो, तेव्हा मनात एकच प्रश्न असतो. आपलं लिहिलेलं लोक वाचतायत का? हे लोक कुठून येतायत? काय वाचतायत? याचं सगळं उत्तर Google Search Console Insights नावाच्या भन्नाट टूलमध्ये मिळतं. चला तर मग जाणून घेऊया या tool बद्दल थोडक्यात.

Google Search Console Insights म्हणजे काय? फायदे आणि वापराची संपूर्ण माहिती

Insights म्हणजे काय बुवा?

सोप्या भाषेत सांगायचं तर, ही एक अशी यंत्रणा आहे जी Google आपल्याला फुकटात देतो. ती आपल्याला सांगते की आपल्या वेबसाइटवर किती लोक आले, कुठून आले, काय वाचून गेले, किती वेळ थांबले… अगदी सगळं! हे Insights म्हणजे आपल्या वेबसाईटचं आरसासारखं आहे. काय चांगलं चाललंय आणि काय कमी पडतंय, सगळं कळतं.

कोण कोण वापरू शकतं हे टूल?

कोणीही वापरू शकतो. ब्लॉगर असो, शिक्षक असो, बातमी टाकणारे असोत, किंवा गावातला बाळ्या ज्यानं नुकताच शेतकी ब्लॉग सुरू केला, तो सुद्धा वापरू शकतो. Insights म्हणजे फक्त मोठ्या लोकांसाठी नाही, अगदी सामान्य लोकांसाठी आहे.

Insights मध्ये काय काय दिसतं?

  • तुमचं कोणतं पान जास्त लोकांनी पाहिलं?
  • नवीन आर्टिकल लोकांना आवडलं का?
  • लोक तुमच्या वेबसाईटवर कुठून येतायत – Google वरून का Facebook वरून?
  • काय काय सर्च करून तुमच्यापर्यंत पोचतायत?
  • कोणत्या वेबसाईटवरून लिंक आलीये तुमच्याकडे?

म्हणजे अगदी बारकाईनं माहिती मिळते. कोण पाहतो, कुठून पाहतो, काय पाहतो.

कसं वापरायचं?

सर्वात आधी Google Search Console ला लॉगिन करा. डाव्या बाजूला “Insights” असं एक टॅब दिसेल. त्यावर क्लिक करा. जर तुमचं Google Analytics 4 (GA4) जोडलेलं असेल, तर अजून मस्त रिपोर्ट मिळतो. नाही जोडलेलं, तरी चालेल, पण माहिती थोडी कमी मिळेल.

Analytics 4 कशाला जोडायचं?

हे Google Analytics 4 जोडल्यावर आपल्याला अजून खोलवर माहिती मिळते. जसं लोक किती वेळ थांबले, Bounce झाले का, पानं बदलली का, मोबाईलवर आले का की लॅपटॉपवर अशी सगळी डिटेलमध्ये माहिती मिळते.

म्हणजे Insights + Analytics = आपल्या वेबसाईटसाठी सोनं पेक्षा भारी!

कशासाठी उपयोगी आहे?

  • नवीन कंटेंट टाकल्यानंतर किती लोकांनी बघितलं हे कळायला
  • कोणता लेख जास्त वाचला जातोय हे समजायला
  • Social Media वरून किती ट्रॅफिक येतोय ते कळायला
  • कुठले Keywords वापरले जातायत ते समजायला
  • पुढच्या लेखासाठी कल्पना मिळवायला

केव्हा बघायचं Insights?

  • दर आठवड्याला एकदा तरी बघा
  • नवीन आर्टिकल टाकल्यानंतर 3-5 दिवसांनी बघा
  • जास्त ट्रॅफिक मिळालं की काय कारण आहे ते समजायला बघा

Insights बघणं म्हणजे शेतात गेल्यावर जमिनीची चव घेऊन अंदाज बांधल्यासारखं “काय खत टाकायचं, कुठे काय कमी पडलं” हे समजायला मस्त टूल आहे.

शेवटचं सांगायचं झालं तर…

भाऊ, जर तू वेबसाईट चालवतोस, ब्लॉग लिहितोस, माहिती शेअर करतोस. तर हे Search Console Insights वापर, फुकट आहे पण उपयोग लाखमोलाचा आहे.
आपलं कंटेंट कुणाला आवडतंय, कुणी बघतंय, कुठून बघतंय हे सगळं जर समजलं तर पुढचं पाऊल घ्यायला सोपं जातं!

मित्रांनो यावर एक छोटं उदाहरण, आपण दिवसभर मेहनत करून भाजी बनवली, पण कोण खाल्लं, किती खाल्लं, आवडली का हे जर समजत नसलं, तर पुढच्या वेळेस काय बनवायचं कसं ठरवणार? Insights हेच सांगतं – कुणी किती ‘खाल्लं’ (वाचलं).

Nitin
Nitin

मित्रांनो, सुरुवातीला फक्त मोबाइलवर ब्लॉग कसा बनवायचा हेच माहिती नव्हतं... पण चिकाटी आणि अभ्यासाच्या जोरावर आज मी 10+ वेबसाइट्स चालवतो. माझं नाव नितीन अनिता पंढरीनाथ राठोड. 2016 पासून ब्लॉगिंगमध्ये आहे. सुरुवात एकदम शून्य पासून झाली. ना कुणी शिकवायला होतं, ना कुठे कोर्स केला... पण जिद्द होती, स्वतःचं काहीतरी डिजिटल तयार करायचं. सध्या माझ्याकडे 5 लोकांची टीम आहे, आणि आम्ही मिळून 10 पेक्षा जास्त निच वेबसाइट्सवर काम करतो. कंटेंट रायटिंग, SEO, ट्रॅफिक ग्रोथ, सगळं काम घरबसल्या नेट वरूनच!

Articles: 11

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *