ब्लॉगिंगमध्ये अपयश येतंय? ही कारणे जबाबदार असू शकतात | Top 10 Reasons Why Most Bloggers Fail A Must Read for Marathi Bloggers

ब्लॉगिंगमधून लाखोंची कमाई करता येते, ब्लॉग सुरू करा आणि घरबसल्या पैसे कमवा. अशा बातम्या आणि सोशल मीडियावरचे रील्स पाहून अनेक जण उत्साहाने ब्लॉगिंगमध्ये उतरतात. पण काही महिन्यांतच त्यांचा उत्साह हा कमी होतो आणि ब्लॉग थांबतो. आणि स्वप्नही अधुरं राहतं. असं का होतं? ब्लॉगिंगमधून खरंच यश मिळतं का? आणि जर मिळत असेल, तर इतके लोक अपयशी का ठरतात? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आपण या पोस्टमध्ये ब्लॉगिंगमध्ये यश न मिळण्यामागची खरी कारणेकोणतीआहेत हे जाणून घेणार आहोत.

ब्लॉगिंगमध्ये अपयश येतंय? ही कारणे जबाबदार असू शकतात | Top 10 Reasons Why Most Bloggers Fail A Must Read for Marathi Bloggers

ब्लॉगिंगमध्ये यश मिळवण्यासाठी नियोजन अत्यंत महत्त्वाचं आहे. अनेक नवीन ब्लॉगर हे सुरुवात तर जोश मधे करतात, पण त्यांच्याकडे स्पष्ट योजना नसते. कोणत्या विषयावर ब्लॉग लिहायचा, कोणती ऑडियन्स लक्षात घ्यायची, SEO चा वापर कसा करायचा, याचे विचार न करता ब्लॉगिंग केल्याने सुरुवातीचा उत्साह लवकरच कमी होतो. त्यामुळे ब्लॉगिंग सुरू करण्यापूर्वी स्पष्ट योजना, स्ट्रॅटेजी आणि वेळापत्रक तयार करणं गरजेचं असतं.

चुकीची Niche निवडणे

अनेक जण फक्त ट्रेंड पाहून किंवा इतरांना कॉपी करून niche निवडतात. पण ती niche त्यांच्या ज्ञानातली नसेल किंवा त्यांना त्यात रसच नसेल. त्यामुळे काही दिवसात कंटाळा येतो. यशस्वी ब्लॉगिंगसाठी niche निवडताना स्वतःच्या आवड, ज्ञान आणि त्या विषयातील मार्केट डिमांड यांचा विचार करणं खूप महत्त्वाचं असतं. चुकीची niche ही संपूर्ण ब्लॉगिंग प्रवासच थांबवू शकते. म्हणून तुम्हाला ज्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट आहे आणि ज्या गोष्टीचं नॉलेज आहे त्याच मी Niche वर काम करा. मी चुकीची niche निवडून माझे 2 वर्ष वाया घालवले होते.

सातत्याचा अभाव

Consistency म्हणजे सातत्य, ही ब्लॉगिंगमधली सर्वात मोठी गुरुकिल्ली आहे. अनेक ब्लॉगर 2-4 पोस्ट लिहितात आणि मग महिन्याभर गायब होतात. यामुळे ना Google त्यांचा ब्लॉग सीरियसली घेतो, ना वाचक. यश मिळवायचं असेल, तर नियमितपणे दर्जेदार कंटेंट प्रकाशित करणं गरजेचं आहे. आठवड्यातून किमान 2-3 पोस्ट ही सुरुवातीला आवश्यक असते.

गुणवत्ता नसलेला कंटेंट

ब्लॉगवर लिहिण्यात येणाऱ्या लेखांची गुणवत्ता अत्यंत महत्त्वाची असते. अनेकदा ब्लॉगर दुसऱ्यांचे लेख थोडा बदल करून पोस्ट करतात किंवा विषय नीट समजून न घेता माहिती शेअर करतात. वाचकांना खऱ्या, उपयुक्त आणि trustable माहितीची गरज असते. जर तुमच्या लेखात “value” नसेल, तर वाचक पुन्हा कधीही तुमच्या ब्लॉगवर येणार नाही.

SEO ची माहिती नसणे

Search Engine Optimization (SEO) हे ब्लॉगिंगचं हृदय आहे. योग्य कीवर्ड रिसर्च, ऑन-पेज SEO, ऑफ-पेज SEO, इमेज ऑप्टिमायझेशन, आंतरलिंकिंग हे सर्व घटक महत्त्वाचे असतात. SEO न कळल्यामुळे अनेक चांगल्या पोस्टला ट्रॅफिक मिळत नाही. त्यामुळे SEO शिकणं आणि त्याचा वापर लेखात करणं ही यशस्वी ब्लॉगिंगची गरज आहे.

ट्रॅफिक मिळवण्यासाठी इतर प्लॅटफॉर्मचा वापर न करणे

फक्त Google वर अवलंबून राहणं हे देखील अपयशाचं कारण ठरू शकतं. अनेक यशस्वी ब्लॉगर सोशल मीडिया, Pinterest, Telegram, Quora यांसारख्या इतर प्लॅटफॉर्मवरूनही ट्रॅफिक आणतात. नवीन ब्लॉगला Google वर रँक मिळायला वेळ लागतो, तेव्हा इतर प्लॅटफॉर्मवर सक्रिय राहणं गरजेचं असतं.

हे सुध्दा वाचा:- Backlink Profile म्हणजे यशाची गुरुकिल्ली, प्रत्येक ब्लॉगरने समजून घ्यायलाच हवे असलेले सत्य

लवकर रिझल्टची अपेक्षा

ब्लॉगिंगमध्ये लगेच यश मिळेल, पैसे येतील, असं अनेकांना वाटतं. पण सत्य हे आहे की, ब्लॉगिंगमध्ये यश मिळायला कधी 6 महिने, तर कधी 1-2 वर्षं लागतात. लवकर परिणाम न मिळाल्यामुळे अनेक जण मधेच सोडून देतात. धैर्य, चिकाटी आणि सातत्य हाच यशाचा खरा मार्ग आहे.

चुकीची कमाईची पद्धत

अनेक ब्लॉगर ब्लॉगवर लगेच AdSense लावतात आणि त्यावरच अवलंबून राहतात. पण AdSense ही फारच कमी उत्पन्न देणारी पद्धत आहे. Affiliate Marketing, Sponsored Posts, ईबुक्स विक्री, कोर्सेस अशा विविध कमाईच्या पद्धती वापरल्यास जास्त उत्पन्न शक्य होतं. पण याबाबत योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने अनेकजण चुकीच्या पद्धतीवर अवलंबून राहतात.

लेखन कौशल्याचा अभाव

ब्लॉग म्हणजे “Content is King”. आणि जर लेखकाला स्पष्ट, सुबोध, आणि आकर्षक पद्धतीने लिहिता येत नसेल, तर वाचक ब्लॉगवर थांबत नाहीत. योग्य भाषाशैली, व्याकरण, लेखाचा फ्लो, उपशीर्षकांचा वापर, बुलेट पॉइंट्स या सर्व गोष्टी अभ्यासून लेखनशैली सुधारणं गरजेचं असतं.

अपडेट न राहणं

ब्लॉगिंग हे सतत बदलतं क्षेत्र आहे. Google चे अल्गोरिदम, SEO चे ट्रेंड्स, कंटेंट मार्केटिंग यामध्ये नियमित बदल होत असतात. पण बरेच जण एकदा शिकून थांबतात. नवीन अपडेट्सकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे त्यांचा ब्लॉग मागे पडतो. सतत शिकणं आणि बदलांना सामोरं जाणं हे यशाचं गमक आहे.

एकटे काम करणे आणि नेटवर्किंगचा अभाव

आजच्या काळात नेटवर्किंग अत्यंत महत्त्वाचं आहे. इतर ब्लॉगरसोबत कनेक्ट होणं, Guest Posting, Community मध्ये सहभागी होणं यामुळे नवीन संधी मिळतात. पण अनेक ब्लॉगर एकटेच काम करतात आणि त्यामुळे त्यांना इतरांपासून काही शिकता येत नाही. नेटवर्किंगमुळे मार्गदर्शन आणि मोटिवेशन दोन्ही मिळतं. मी तर सगळ्या सोबत कनेक्ट राहतो आणि शिकत राहतो.

टेक्निकल बाबींकडे दुर्लक्ष

ब्लॉगिंगमध्ये फक्त लेख लिहिणं पुरेसं नाही. Hosting, Speed, Mobile Optimization, SSL, Sitemap, Indexing अशा अनेक टेक्निकल गोष्टींचं योग्य ज्ञान नसेल, तर ब्लॉग Google मध्ये नीट रँक होत नाही. त्यामुळे ब्लॉगरने या गोष्टींचा अभ्यास करायला हवा.

कंटेंट प्रमोशनचा अभाव

फक्त ब्लॉग लिहून पोस्ट केल्याने वाचक येत नाहीत. तो कंटेंट योग्य प्रकारे प्रमोट करणं गरजेचं आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, WhatsApp, Telegram, Email Marketing यांचा वापर करून लेख जास्त लोकांपर्यंत पोहोचवणं हे यश मिळवण्याचं एक मोठं साधन आहे. पण अनेक ब्लॉगर हे टाळतात.

स्व-अभ्यासाचा अभाव

ब्लॉगिंग हा सतत शिकत राहण्याचा प्रवास आहे. नवीन कोर्सेस, ईबुक्स, यूट्यूब चॅनेल्स, ब्लॉग्स यामधून सतत नविन शिकत राहणं खूप महत्त्वाचं आहे. पण जे ब्लॉगर हे करत नाहीत, तेच काही महिन्यांत ब्लॉगिंग सोडून देतात. स्व-अभ्यास हा यशाचा पाया आहे.

धीर न राखणे

सर्वात शेवटी, यश न मिळण्यामागचं मूळ कारण म्हणजे धीर न राखणे. ब्लॉगिंगमध्ये कधी कधी चांगलं काम करूनही निकाल दिसत नाही. पण अशावेळी संयम ठेवणं, चुका ओळखणं आणि सुधारणा करत राहणं हे आवश्यक आहे. जो जिद्दीने टिकतो, तोच या क्षेत्रात यशस्वी होतो.

ब्लॉगिंगमध्ये यश मिळणं सहज शक्य आहे. पण त्यासाठी संयम, सातत्य, योग्य मार्गदर्शन, आणि वेळेचं व्यवस्थापन आवश्यक आहे. वर उल्लेख केलेली कारणं ओळखून त्यावर योग्य काम केल्यास कुठलाही ब्लॉगर यशस्वी होऊ शकतो. गरज आहे ती फक्त न थांबता शिकत राहण्याची, अंमलात आणण्याची आणि आपल्या वाचकांना खरी “value” देण्याची.

अपयश म्हणजे शेवट नाही, तर सुरुवातीसाठीचा इशारा आहे. योग्य पद्धती, योग्य मार्गदर्शन आणि चिकाटी असेल, तर तुम्हीही यशस्वी ब्लॉगर नक्कीच बनू शकता!

Nitin
Nitin

मित्रांनो, सुरुवातीला फक्त मोबाइलवर ब्लॉग कसा बनवायचा हेच माहिती नव्हतं... पण चिकाटी आणि अभ्यासाच्या जोरावर आज मी 10+ वेबसाइट्स चालवतो. माझं नाव नितीन अनिता पंढरीनाथ राठोड. 2016 पासून ब्लॉगिंगमध्ये आहे. सुरुवात एकदम शून्य पासून झाली. ना कुणी शिकवायला होतं, ना कुठे कोर्स केला... पण जिद्द होती, स्वतःचं काहीतरी डिजिटल तयार करायचं. सध्या माझ्याकडे 5 लोकांची टीम आहे, आणि आम्ही मिळून 10 पेक्षा जास्त निच वेबसाइट्सवर काम करतो. कंटेंट रायटिंग, SEO, ट्रॅफिक ग्रोथ, सगळं काम घरबसल्या नेट वरूनच!

Articles: 9

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *