मित्रांनो आजच्या इंटरनेटच्या दुनियेत ब्लॉगिंग म्हणजे शेतातलं ‘बी’ आहे. ते बरोबर पेरलं, पाणी घातलं, खत टाकलं तर त्यातून उत्पन्न नक्कीच मिळतं. पण हे सगळं करताना काही लोक एक मोठी चूक करतात ती म्हणजे, ते फक्त “हंगामी” म्हणजेच सिझनल कंटेंटवर भर देतात. म्हणजेच, जे आज हिट आहे, त्यावर लेख लिहायचं. पण उद्या त्याचं कोणी नावसुद्धा काढत नाही.
इथंच Evergreen Content म्हणजेच “नेहमी टवटवीत राहणारा कंटेंट” तुमच्या ब्लॉगचं खरं सोने बनू शकतं. चला तर मग बघूया, हे Evergreen Content म्हणजे काय, कसं करायचं, आणि का हेच खरं पैसा कमवणारं साधन आहे.
कधीही जुना न होणारा कंटेंट? जाणून घ्या Evergreen Content बद्दल | What is Evergreen Content in Blogging?
Evergreen Content म्हणजे काय?
“Evergreen” या शब्दाचा अर्थच हा नेहमी हिरवं राहणारं आहे. अगदी आपल्या आंब्याच्या, फणसाच्या झाडासारखं. पावसाळा असो की उन्हाळा, ते झाड तग धरून असतं. ब्लॉगिंगमध्येही असंच आहे. असा लेख, अशी माहिती, असं काहीतरी जे वर्षभर लोक शोधत असतात, त्यालाच Evergreen Content म्हणतात.
उदाहरण,
- ब्लॉग कसा सुरू करावा? ह्या प्रश्नाचं उत्तर आजही लोक शोधतात, 5 वर्षांपूर्वीही शोधत होते, आणि पुढे 5 वर्षांनीही शोधतील.
- SEO म्हणजे काय?हा विषय कधीच जुना होत नाही.
- पैसे कमवण्यासाठी सर्वोत्तम App कोणते?नेहमी ट्रेंडमध्ये असलेलं टॉपिक.
हंगामी कंटेंट आणि Evergreen कंटेंटमधला फरक काय आहे?
Evergreen Content का लिहायला हवा?
- सतत ट्रॅफिक येतो : एकदा चांगला Evergreen लेख लिहिलास, की तो गुगलमध्ये रँक होईल आणि वर्षानुवर्षं वाचक येत राहतील.
- AdSense आणि Affiliate मध्ये कमाई : जिथं लोकं जास्त वेळ घालवतात, तिथंच Ad क्लिक होतात. Evergreen कंटेंटमुळे लोक वारंवार येतात.
- ब्लॉगची ओळख बनते: तुमचं नाव जास्त लोकांपर्यंत पोहचतं. लोक तुम्हाला माहिती देणारा माणूस मानतात.
- हा टाइमपास नाही, इन्व्हेस्टमेंट आहे: Evergreen कंटेंट म्हणजे एक वेळचं काम, पण अनेक वेळा मिळणारा फायदा.
Evergreen Content कसं ओळखायचं?
खरं सांगतो मित्रांनो , हे कंटेंट Google मध्ये दर महिन्याला शोधलं जातं का? दरवर्षी लोक त्याची माहिती घेतात का? हे तपासायला Google Trends वापर कर.
काही टॉपिक आयडिया
- ब्लॉगिंगसाठी सर्वोत्तम प्लॅटफॉर्म कोणता?
- ब्लॉगमध्ये SEO कसं करायचं?
- ब्लॉगवर पैसे कसे कमवायचे?
- Affiliate मार्केटिंग म्हणजे काय?
- ब्लॉगसाठी मोफत टूल्स
Evergreen Content लिहिताना लक्षात ठेवायच्या गोष्टी
साधं आणि सरळ लिहा:
गावठी भाषेत, पण माहितीपूर्ण पद्धतीने लिहा. लोकांना समजलं पाहिजे.
हेडिंग्स, बुलेट्स वापरा
वाचक पटकन समजू शकतील असं मांडणं ठेवा.
SEO चा विचार करा
कीवर्ड वापरा पण नैसर्गिकपणे. फुकट भरू नका.
उदाहरण वापरा
जसं आपण इथे केलंय, तसं उदाहरण दिलं की वाचक लगेच कनेक्ट होतो.
माझा अनुभव, Evergreen Contentने माझं आयुष्य बदललं
मी सुरुवातीला WhatsApp Trick, New Earning App यावर लेख लिहायचो. 2-4 दिवस धमाका, आणि मग शुकशुकाट. पण जेव्हा मी ब्लॉगिंग कसा करावा?, SEO म्हणजे काय? हे evergreen टॉपिक लिहायला सुरुवात केली, तेव्हा traffic हळूहळू वाढायला लागला. आता मला काही लेखांनी महिन्याला हजारो views आणि पैसे मिळतात तेही लिहून 1-2 वर्षं झाली तरी.
हे सुध्दा वाचा:- ब्लॉगिंग म्हणजे काय? संपूर्ण माहिती
Evergreen Content चे प्रकार कोणत्या स्वरूपात लिहिता येतं?
सांगायचं म्हणजे evergreen content फक्त “काय?” असं विचारणं नसतं, त्याचं वेगवेगळं रूप असतं:
How-to guides:
उदा. ब्लॉग पोस्ट कशी लिहावी?
लोकं नेहमी हे शिकायला येतात.
List posts:
उदा. मोफत SEO tools ची यादी
माहिती थेट आणि सुलभ.
Tips & Tricks:
उदा. ब्लॉगिंगसाठी 10 खास टिप्स
कायम उपयुक्त असणारा प्रकार.
Glossaries:
उदा. ब्लॉगिंगचे महत्त्वाचे शब्द आणि त्याचा अर्थ
बिगिनर्ससाठी खूप उपयुक्त.
Case Studies:
उदा. माझा ब्लॉगिंग प्रवास 0 ते 1 लाख views
लोकांना प्रेरणा आणि शिकायला दोन्ही मिळतं.
Evergreen Content Update का करावं लागतो?
जरी तो “नेहमीसाठी उपयुक्त” असला तरी Google अपडेट्स, टेक्नॉलॉजी बदल, नविन टूल्स या सगळ्यामुळे आपल्याला content मध्ये बदल करावा लागतो.
उदाहरण:
- “ब्लॉग सुरू करण्यासाठी Top 5 प्लॅटफॉर्म” जर Wix किंवा WordPress मध्ये काही नविन फिचर आलं, तर ते टाकणं गरजेचं.
- त्यामुळे दर 3-4 महिन्यांनी evergreen लेख पुन्हा एकदा वाचा, अपडेट करा आणि Google ला कळवा की, बाबा हे फ्रेस माहिती आहे.
Evergreen Content चा एक खास फायदा, Passive Income
जसा शेतीत शेतकरी शेवटी “शेती करणारा नसून मालक” बनतो, तसंच evergreen content तुला blogger वरून Digital Asset Owner बनवतो. तू झोपलेला असताना पण traffic, clicks आणि पैसे येत राहतात.
मित्रांनो ट्रेंड येतात आणि जातात, पण जे नेहमी लोकांच्या डोक्यात राहतं, त्यालाच खरं कंटेंट म्हणतात. Blogging म्हणजे शर्यत नाही, ही तर बैलजोडीची मळ्यातली चाल आहे. हळूहळू, पण थेट भरगच्च उत्पन्न देणारी! Evergreen Content म्हणजे तुमच्या ब्लॉगचं खतपाणी ते नीट दिलंत, तर तुमचं डिजिटल शेत सोनं उगमायला वेळ लागणार नाही.
म्हणून रं, पुढच्यावेळी लेख लिहायला बसलात ना, तर एकच लक्षात ठेवा ‘व्हायरल’ नाही, ‘वॅल्युएबल’ कंटेंट लिहा. कारण ट्रेंड एक दिवस संपतो, पण Evergreen content, तो काळाच्या पुढंही टिकतो.



