मित्रांनो आजच्या डिजिटल युगात ब्लॉगिंग (Blogging) ही एक प्रभावी आणि कमाईसाठी उपयुक्त अशी स्कील बनली आहे. अनेक लोक आपल्या ज्ञानाचा उपयोग करून ब्लॉग लिहून त्यावरून चांगली कमाई करत आहेत. पण अनेक नवीन व्यक्तीच्या मनात एक प्रश्न असतो तो म्हणजे, बलॉगिंग म्हणजे नक्की काय? आणि याची सुरुवात कुठून करावी? चला तर मग, या पोस्टमध्ये आपण ब्लॉगिंगची संपूर्ण माहिती आणि सुरुवातीची योग्य दिशा जाणून घेऊया.
ब्लॉगिंग म्हणजे काय? संपूर्ण माहिती | What is Blogging? Complete Guide in Marathi
ब्लॉगिंग म्हणजे काय?
ब्लॉगिंग म्हणजे एखाद्या विशिष्ट विषयावर माहितीपूर्ण, उपयोगी आणि वाचकांना मदतीचा ठरणारा लेख इंटरनेटवर लिहिणे. हे लेख तुमच्या स्वतःच्या वेबसाइटवर, किंवा इतर ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर लिहिले जातात.
ब्लॉग (Blog) हा शब्द “Web Log” मधून तयार झाला आहे, ज्याचा अर्थ आहे. इंटरनेटवर ठेवलेली माहितीची डायरी.
सुरुवातीला लोक आपल्या अनुभवासाठी किंवा छंदासाठी ब्लॉग लिहायचे. पण आता ब्लॉगिंग एक करिअर आणि व्यवसाय बनला आहे. तुम्ही विविध विषयांवर ब्लॉग लिहू शकता. जसं की टेक्नॉलॉजी, हेल्थ, एज्युकेशन, ट्रॅव्हल, फूड, फायनान्स, ब्यूटी, करिअर गाईडन्स इत्यादी.
अजून पण समजल नसेल तर गावठी भाषेत सांगतो, ब्लॉगिंग म्हणजे आपल्याला जे कळतं, जे जमतं, ते सगळं इंटरनेटवर लोकांसमोर मांडणं. जसं की, एखादी रेसिपी, शेतीविषयक माहिती, शिक्षणाची गाइड, टेक्नॉलॉजीचं समजावणं अस काहीही असो. जेव्हा आपण इंटरनेटवर आपलं अनुभव, ज्ञान लोकांना सांगतो, त्यालाच ब्लॉगिंग असे म्हणतात. मित्रांनो इथून पुढे सगळ तुम्हाला गावठी भाषेतच सांगतो.
काय फायदा होतो ब्लॉगिंगचा?
मित्रांनो ही सुद्धा एक कमाईची शर्यत आहे. ब्लॉगवरून पैसे मिळतात, जस की, गुगल अॅड्स लावून, कुणाचे प्रॉडक्ट्स प्रमोट करून, किंवा आपलं काही विकून. शिवाय नाव होतं ते वेगळंच, लोक ओळखायला लागतात. आणि सगळ्यात भारी म्हणजे, कुणाच्या खालचं काम नाही, आपलंच काम, आपणच बॉस!
ब्लॉग कसा सुरू करायचा रं मग?
असं समज की शेती करायची आहे, तर आधी जमीन हवी, मग बी, मग पाणी आणि शेवटी मेहनत. तसंच इथेही आहे.
विषय ठरव, म्हणजेच निच रे
तुला काय जास्त माहिती आहे, किंवा काय करायला आवडतं ते तू ठरव. उदा. तू रोज नवनवीन मोबाईल बघतोस, तर टेक ब्लॉग चालेल. एखादा स्वयंपाकात पटाईत आहे तर फूड ब्लॉग बनव. लोक हे जास्त शोधतात आणि तुलाही आवडतं हाच कॉम्बो पाहा. आणि कामाला लागा.
डोमेन आणि होस्टिंग घे
जसं दुकान चालवायचं तर दुकानाचं नाव आणि जागा लागते, तसंच ब्लॉगसाठी ‘डोमेन’ म्हणजे नाव, आणि ‘होस्टिंग’ म्हणजे जागा. GoDaddy, Hostinger यावरून तुम्ही या दोन्ही गोष्टी घेऊ शकता.
WordPress वापरून ब्लॉग उभा कर
WordPress म्हणजे अगदी रेडीमेड साच्याचं दुकान. तिथे सगळं रेडी आहे, फक्त आपल्या हिशोबाने थोडंफार सेट करायचं. ही एकदम सोपी गोष्ट आहे, कोडिंग काही लागत नाही.
लेख लिहा ते पण मनापासून
कोणताही लेख असो, त्यात आपलं खरा अनुभव, माहिती आणि थोडं अभ्यास असायला हवा. गुगलसाठी ‘कीवर्ड’ वापरा, पण लोकांसाठी उपयोगी गोष्ट द्या. Heading वापरा, फोटो टाका आणि मजकूर मस्त स्पष्ट ठेवा.
लोकांपर्यंत पोहोचा आणि प्रमोशन करा
फक्त लिहून उपयोग नाही, लोकांना सांगावं लागतं. WhatsApp वर शेअर करा, Facebook, Instagram वापरा. जिकडं शक्य तिकडं शेअर करा. गुगललाही सांगायला विसरू नका आणि Search Console मध्ये जोडा.
आता कमाई सुरू होईल का?
थोडं वाट बघ लागेल. पण नियमितपणे पोस्ट लिहित राहिला की लोक आपोआप येथील ब्लॉगवर आणि हळू हळू ट्रॅफिक वाढलं की मग Google AdSense मंजूर होईल. एफिलिएट सुरू होईल आणि पैशाचा पाऊस पडायला वेळ लागणार नाही.
शेवटी नाद करायचा असेल तर चिकाटी हवी!
खरं सांगायचं तर हे काम सोपं नाही, पण शक्य नक्कीच आहे. रोज 1 लेख, आठवड्यातून 3 पोस्ट बस एवढं केलं तरी 6 महिन्यांनी तुला म्हणशील, अरे वा, खरंच जमलं की आपल्याला.
ब्लॉगिंग म्हणजे डिजिटल शेत आहे. सुरुवातीला जमीन तयार कर, बी पेर, पाणी घाल आणि मेहनत कर. नंतर फळं पक्की मिळतात. गावात असलो तरी मोबाईलवरून संपूर्ण जगाशी बोलू शकतो. तर काय रे! सुरू करूया का ब्लॉगिंग? काही प्रोब्लेम आला तर instagram वर @bloggingwithnitin ला message कर.



